Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MPSCResultUpdate : GoodNews : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निकालही जाहीर , यांनी पटकावला पहिला क्रमांक …

Spread the love

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पाठोपाठ  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या , एमपीएससी परीक्षेचाही निकाल जाहीर झाला आहे. एमपीएससीच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकूण दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. राज्यात ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० घेण्यात आली होती.


या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. प्रमोद बाळासाहेब चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून पहिला आला आहे. तर रूपाली गणपत माने या महिलांमधून तर गिरीश विजयकुमार परेकर हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.

दरम्यान एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीचाही (MPSC Civil Engineering) निकालही  आजच जाहीर करण्यात आला आहे. एकूण ६५२ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात रोहित कट्टे स्थापत्य अभियांत्रिकीत राज्यात प्रथम आला आहे.

हा निकाल आपण https://mpsc.gov.in/downloadFile/english/4985 या लिंकवर क्लिक करून पाहू शकता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!