Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू

Spread the love

रत्नागिरी :  गुहागर तालुक्यातील चिखली येथील वडील आणि मुलाचा कोरोनामुळे एकाच दिवशी मृत्यू झाल्याचे  वृत्त आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले असून चिखली गावावर शोककळा पसरली आहे. चिखली बौध्दवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व चिखली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश महादेव गमरे यांचे कोरोनाने दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा विवाहित मुलगा सुरज यालाही कोरोनाची लागण झाल्याने हे दोघेही कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत होते. मात्र, सकाळी वडिलांचा तर संध्याकाळी मुलाचा अशा दोघांचाही उपचारादरम्यान, मृत्यू झाला.

सुरेश गमरे हे रिक्षाचालक होते. चिखली कारुळ फाट्यावर त्यांचा गेली 20 वर्षे रिक्षा व्यवसाय होता. यातूनच ते आपल्या कुटुंबाची गुजराण करायचे. चिखली ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते. सुरेश गमरे यांचा वृध्द आई, पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. एक मुलगा अशक्त असून त्याचे व मुलीचा अद्याप विवाह झालेला नाही. दुसरा मुलगा सूरज हा नोकरीनिमित्त दुबईला होता. मात्र, गेल्यावर्षी कोरोना आपत्तीपासून तो गावीच होता. त्याचा 6 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबाचा सारा भार वडील व मुलावर असतानाच नियतीने घातलेला हा घाला संपूर्ण चिखली गावाला धक्का देणारा ठरला आहे. दरम्यान गावाच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सुरेश गमरे यांचे महत्वपूर्ण योगदान होते .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!