Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidarbhaNewsUpdate : चंद्रपूर-मूल महामार्गावर मोठा अपघात, २ मित्र – २ मैत्रिणी जागीच ठार , १ जखमी

Spread the love

चंद्रपूर-मूल महामार्गावर मंगळवारी रात्री साडे  दहा वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस साजरा करुन परत येत असतांना भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या बिशन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर वाढदिवस असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही हा अपघात इतका भीषण होता यात अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मृतांमध्ये मूल येथील तांदूळ व्यापारी राजू पटेल यांचा मुलगा स्मिथ आणि इतरांचा समावेश आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि, मुल येथील प्रतिष्ठीत व्यावसायिक  हिरेन शाह यांचा मुल योग शहा  याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व मित्र हॉटेलमध्ये गेले होते. चंद्रपुर रोडवरील एका हॉटेलमध्ये बर्थडे पार्टीचे सेलिब्रेशन झाल्यानंतर  रात्री उशिरा सर्व जण घरी येण्यासाठी निघाले होते. दरम्यान चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागातून जाताना एक ट्रॅक्टर शेतातून अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला. त्यावेळी वेगात असलेली गाडी ट्रॅक्टरवर धडकल्यानंतर तिचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात अमन समिर शेख (२३ ) , सुमीत राजू पटेल (२५ ) , दर्शना विष्णु उधवानी (२५) , प्रगती विजय निमगडे (२४ )हे जागीच ठार झाले तर योग शाह हा गंभीर जख्मी झाला असुन त्याला चंद्रपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहे. या अपघाताची  माहिती मिळताच  मुल शहरात शोककळा पसरली . चारही मृतदेह शवविच्छेदना करीता चंद्रपुर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले.  कार योग शाह चालवत असल्याचे समजते. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!