Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोविड -१९ च्या चाचणीसाठी आता डॉक्टरच्या चिट्ठीची गरज नाही , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवी सूचना जारी

Spread the love

देशभरात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी, भारत सरकारने कोरोना टेस्टिंगच्या धोरणात मोठा बदल केला आहे. पहिले डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय लोकांना आपली करोना टेस्ट करून घेता येत नव्हती. मात्र, आता जर कुणाला करोना टेस्टिंग करून घ्यायची असेल, तर यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनची गरज लागणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ टेस्टिंग संदर्भातील अॅडव्हाझरीमध्ये काही बदल केले आहेत. ज्यानुसार लोकांना ऑन-डिमांड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आता डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय कोविड-१९ टेस्ट करता येणार आहे. याशिवाय असे व्यक्ती जे प्रवास करत आहेत आणि आपली टेस्ट करून घेऊ इच्छित आहेत. ते देखील ऑन-डिमांड कोविड -१९ टेस्ट करून घेऊ शकतात.

कोविड १९ साथरोग नियमांतर्गत आतापर्यंत देशात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेश, डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन किंवा परिसरात प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासण्या दरम्यान कोविड-१९ साठी टेस्टिंग करता येत होते. मात्र, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे कोविड- १९ टेस्टिंगमध्ये करण्यात आलेल्या या बदलानंतर आता कुणालाही डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय ऑन-डिमांड करोना टेस्टिंग करून घेणं शक्य होणार आहे. या निर्णयानंतर जर एखाद्या व्यक्तीत करोनाची लक्षणं आढळत असतील, तर त्याला हवं असेल तर कोविड चाचणी करून घेऊ शकतो. याचबरोबर ज्यांनी मागील १४ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. त्यांच्यातील लक्षणं असणाऱ्या व्यतिरिक्त देखील सर्व लोकांची चाचणी केली जाईल. एखाद्या दुसऱ्या राज्याचा किंवा देशाचा प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड -१९ निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरोग्य विभागाद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Click to listen highlighted text!