Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : दोन लाख रुपये भरुनही कोरोनबाधित रुग्णावर उपचारास विलंब , नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

Spread the love

रुग्णालयाने सांगितल्याप्रमाणे उपचारासाठी दोन लाख रुपयेही जमा करूनही उपचारास विलंब होत असल्याचे लक्षात येताच कोरोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांनी नागपूरमधील कोराडी मार्गावरील कुणाल हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हल्ला करुन तोडफोड केली. ही घटना ३१ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. रवी श्याम सूर्यवंशी  (वय ३६, रा. वंजारीनगर, अजनी), असे  मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण गंजीपेठ येथील रहिवासी आहे. ३१ ऑगस्टला त्याला कोरोनाचा असल्याचे निदान झाले. नातेवाइकांनी त्याला कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णावर उपचारास विलंब होत असल्याने नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. डॉ. रवी हे नातेवाइकांची समजूत काढत असताना, दोन नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ केली. एका नातेवाइकाने हातातील काचेची बाटली फोडून रवी यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पैसे परत घेतले  आणि  रुग्णाला घेऊन नातेवाइक कारने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!