Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : जनक्षोभ लक्षात घेता , राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळे सुरु होण्याचे संकेत

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनला लोकांनी प्रारंभी चांगला प्रतिसाद दिला परंतु सरकारकडून लोकांना कोणतीही भरीव मदत मिळणे दूरच  पण होते नव्हते ते उद्योग धंदेही बुडाले. परिणामी देशाची अर्थ व्यवस्थाही धोक्यात आली . दरम्यान गेल्या महिनाभरापासून सरकारने अनलॉकचा खेळ सवडीने सुरु केला असला तरी अनेक उद्योग धंदे आणि लोकांची  श्रद्धा स्थाने असलेली मंदिरं  आणि प्रार्थना स्थळे सुरु करण्याची मागणी होत असताना , लोक आता ऐकणार नाहीत हे लक्षात घेऊन सरकारने आता मंदिर आणि जीम सुरू करण्याबाबतचे संकेत दिले आहेत . शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत विधान केले आहे.  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची शक्यता आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख वारकऱ्यांना घेऊन  पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी पंढरपुरात धडकण्याची इशारा दिला आहे तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने परवानगी दिली नाही तरी मशिदी उघडण्याचा इशारा दिला होता . भाजपनेही मंदिरं उघडण्यासाठी घंटा नाद आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिर्डी संस्थाननेही साई मंदिर उघडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्र घेतला होता. दरम्यानच्या काळात पर्युषण पर्वाच्या काळात मुंबईतील तीन जैन मंदिरं उघडण्याची परवानगी देत राज्य शासनावर ताशेरे ओढले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंदिरं आणि धार्मिक स्थळांना परवानगी देण्याच्या विचारात आहे.

या शिवाय राज्यातील हॉटेल आणि जिम यांनाही परवानगी देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे , पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर खासगी वाहनांना सध्या लागू असलेली ई -पासेसची अटही रद्द करावी अशी मागणी होत आहे . केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जरी केले असले तरी राज्य शासन हि अट तूर्त रद्द करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून राज्यात सरकारकडून काही बाबतीत आणखी सकारत्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन आला आणि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली. आता करोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन जनतेला केलं जात असून टप्प्याटप्प्याने अनलॉक केलं जात आहे. त्यात आता भाविकांसाठी मंदिर, मशीद,चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार खुली करावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!