JalgaonNewsUpdate : बहिणीला नांदवत नसल्याच्या रागातून मेहुण्याला भर रस्त्यात आडवा करून तो स्वतःहून अटक झाला…

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगावमध्ये  बहिणीला नांदवत नसल्याच्या रागात तरुणाने मेव्हण्याची हत्या करून  आरोपी तरुणाने हत्येनंतर रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलीस स्थानक गाठल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपुर्वी लग्‍न झालं असताना पती-पत्‍नीमध्ये नेहमी वाद भांडण व्हायचं. म्‍हणून आरोपीची बहीण कायम माहेरी रहायची. त्यामुळे  आपल्‍या बहिणीला नंदवत नाही या गोष्टीचा राग आल्याने तरुणाने  मेव्हण्याला रस्‍त्‍यावरच  ठार मारत रक्‍ताने माखलेल्या चाकूसहित पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःला अटक करवून घेतली.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि , नेरी (ता. जामनेर) इथे माहेरी असलेल्‍या विवाहितेचे तीन वर्षांपूर्वी   चिंचखेडा बु. या गावातील भागवत मोतीराम पारधी याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्‍यानंतर काही दिवसच सासरी राहून  ती माहेर आली. माहेरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठविले असता, पती- पत्‍नीमध्ये सातत्‍याने वाद होत रहायचे. यामुळे विवाहिता वारंवार माहेर येत असते. ही बाब तिचा भाऊ परमेश्‍वर प्रकाश पारधी याला खटकत होती. यामुळे त्‍याचे मेहुणे भागवत पारधी यांच्याबद्दल त्‍याच्या मनात राग निर्माण झाला होता. यामुळे त्याने आपल्या मेहवण्याला लहासर गावाच्या फाट्यावर रस्‍त्‍यातच रोखलं आणि चाकून सपासप वार केलं. यात भागवत पारधी यांचा जागीच मृत्‍यू झाला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, यानंतर रक्‍ताने भरलेला चाकून घेऊन स्वतःहून  पोलीस ठाण्यात आला आणि खुनाची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. अधिक टॉप्स चालू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार