MumbaiNewsUpdate : स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ विरोधात भडकली कंगना

Advertisements
Advertisements
Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ  वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद सुरु आहे. महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशा आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर केल्या जात आहेत. अभिनेत्री कंगना राणावत ने  देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements

कंगनाने तिचे मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही आहे, ज्यांचा काहीच उपयोग नाही आहे असे लोक शहीदांची खिल्ली उडवतात ते केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी. हे योग्य नव्हे. नॅशनल हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा असणे गरजेचे आहे’, असे ट्विट करत कंगनाने या साऱ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उपहासात्मक वक्तव्य करणाऱ्या अग्रिमा जोशुआवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती. तिला बलात्काराच्या धमक्या देणारा व्हिडीओच शुभम मिश्रा या तरुणाने पोस्ट केला होता. याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करसह अनेकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान वडोदरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आपलं सरकार