Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMaharashtraUpdate : राज्यात तीन हजार पोलिसांना कोरोनाची बाधा

Spread the love

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत असून राज्यात करोनाबाधिता पोलिसांचा आकडा ३००० पर्यंत पोहोचला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर, आतापर्यंत ३० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. राज्यात तब्बल ३७ हजार पोलिसांना सॉफ्ट ड्युटी दिली आहे. तर, ५० ते ५५ वर्षावरील २३ हजार पोलिस पोलिस ठाण्यातील ड्युटीवर आहेत. ड्युटीवर नसलेल्या १२ हजार पोलिसांनी पगारही वेळेत मिळत असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

१० हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या कैद्याना सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. राज्यातील कारागृहातून जवळपास ९६७१ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले असून लवकरच उर्वरित कैद्यांनाही सोडण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील ६० कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. कारागृहात ३८ हजार कैदी आहेत. सोशल डिस्टनसिंगसाठी ११ हजार अधिक कैद्यांना तातडीने पॅरोल मंजुर करून सोडण्यात येणार आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुणे दौऱ्यावर होते त्यांनी यावेळी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे हे उपस्थित होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर गृहमंत्री देशमुख हे येरवडा येथील अनाभाऊ साठे महामंडळ ई लर्निंग स्कुल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी सवांद साधत काळजी घेण्यास सांगितले.

अभिनेता सोनू सूद यांचे कौतुक 

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापलं आहे. ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्यासाठीच सोनू सूदला पुढं केलं जातंय अशी टीका राऊतांनी केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. सोनू सूद चांगलं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेता सोनू सूद चांगलं काम करतोय. त्याच्यामुळं हजारो स्थलांतरित श्रमिक त्याच्या राज्यात परतले आहे. संजय राऊतांचे त्याच्याबद्दलचे विधान अद्याप मी पाहिलं नाहीये. पण, करोनाच्या या लढ्यात सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच, सोनू सूदचं अभिनंदनही केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!