Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News : एक्स्पायरी डेट आणि किमतीत बदल करणाऱ्या कंपनीवर छापा, ५० लाखाचे सॅनिटायझर केले जप्त…

Spread the love

कोणत्या संकटाचा कोण कसा आपल्या फायद्यासाठी वापर करेल अंगात येत नाही मग चढ्या भावाने मास्क विक्रीचा प्रकार असो कि , ग्राहकांची कोणत्याही प्रकारे लूट करणे असो . असच एक प्रकार ऍन व औषधी प्रशासनाने उघडकीस आणला असून ५० लाखांचा सॅनिटायझरचा  साठा जप्त करण्यात आला आहे. रविवारी वाळूज परिसरातील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीत ही मोठी कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमधून सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे . हे लक्षात घेऊन या कंपनीमध्ये सॅनिटायझर वापरण्याची मुदत ( एक्स्पायरी डेट ) आणि किंमत बदलून फसवणुकीचा प्रकार केला जात होता दरम्यान अन्न व औषध विभागाने  हा काळाबाजार उघडकीस आणून तब्बल ५० लाखांचे सॅनिटायझर जप्त केले आहेत.

गुजरात येथील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीमध्ये मुदतबाह्य झालेले सॅनिटायझरची किंमत बदलून विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचे अन्न व औषधी विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीमध्ये रविवारी धाड टाकत हि धडाकेबाज कारवाई केली. कंपनीने गुजरातमधून सॅनिटायझर औरंगाबादला आणले होते. ज्याची वापरण्याची मुदत (एक्पायरी डेट) मार्चमध्ये संपत होती. हे लेबल बदलून पुढील तारखेचे लेबल तयार करून सदर सॅनिटायझर बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न सदर कंपनीचा होता. हा प्रकार अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमध्ये औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगोपाल बजाज, वर्षा महाजन, आर. बी. डोईफोडे व निलेश पासळ आदींनी सहभाग घेतला.

दरम्यान करोनाचा संसर्ग  वाढत असताना बनावट हॅण्ड सॅनिटायझर विक्री करण्याच्या प्रकारांमध्येही वाढ झाली होती. मुंबई परिसरात काही दिवसांपूर्वीच अशा बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्येही  लाखो रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले होते. औरंगाबादमधील हि कारवाई मुंबईनंतरची सर्वात मोठी कारवाई आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!