Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संसदेत मोजून सात वेळा खोटे बोलल्याने ” या “खासदाराला झाली तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

Spread the love

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी व सल्लागार रॉजर स्टोन यांना अमेरिकेच्या संसदेच्या सात वेळेस खोटं बोलल्याप्रकरणी अमेरिकन कोर्टाने ४० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ट्रम्प सरकारने हा निर्णय राजकीय असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या आरोपांप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. रॉबर्ट मूलर यांनी एक चौकशी अहवाल तयार केला. त्याआधारे कोर्टाने रॉजर स्टोन यांना ही शिक्षा सुनावली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी व सल्लागार रॉजर स्टोन यांनी अमेरिकन संसदेत सात वेळेस खोटं विधान केले. त्यांच्या खोट्या वक्तव्यामुळे देशाची दिशाभूल झाली. त्याशिवाय चौकशीतही त्यांच्यामुळे विघ्न आले असल्याचा ठपका लावण्यात आला होता. कोर्टाने स्टोन यांना ४० महिन्यांचा तुरुंगवास, दोन महिन्यांचे प्रोबेशन आणि २० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे.

रॉबर्ट मूलर यांच्या चौकशी अहवालात २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि रशिया यांच्यातील संबंधावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रॉर्जर स्टोन यांना बरीचशी माहिती होती. मात्र, त्यांनी ती दडवून ठेवत देशाची दिशाभूल केली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यांची कृती संविधानाविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टोन यांची पाठराखण केली आहे. आपण कोर्टाचा निकाल वाचत असून त्याला व्यवस्थित समजून घेणार असल्याचे म्हटले. स्टोन यांना फक्त राजकारणामुळे शिक्षा झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!