Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ष्ट्र बंद Live : वंचितच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद , अनेक ठिकाणी हिंसक वळण , हिंसक कार्यकर्ते आमचे नाहीत , आमचा बंद शांततेत : प्रकाश आंबेडकर

Spread the love

“एनसीआर सीएए एनपीआर व आर्थिक डबघाई विरोधात बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे,आम्ही जनतेला कैद केले नाही. महाराष्ट्र बंद यशस्वी. हा मुद्दा जनते पर्यंत पोहचविण्या करीता हा बंद आहे.हिंसाचार किंवा बळजबरी करणे हा आमचा हेतू नाही.तोडफोड होवू न देणे ह्याला प्राथमिकता आहे, जनतेत हा ईश्यू जाणे महत्वाचे. शांततापूर्ण  बंद १००% यशस्वी ” : बाळासाहेब आंबेडकर


अमरावतीमध्ये वंचीतच्या कार्यकत्यांचे आंदोलन. अमरावतीमध्ये देखील बंदला हिंसक वळण; पोलिसांची कार्यकर्त्यांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज. नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक बंदमुळे शालिमार परिसरातील बाजारपेठ बंद. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने. बारामतीमध्ये बंदला प्रतिसाद; व्यवहार ठप्प.

वंचित बहुजन आघाडीने सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात  पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जनजीवन सुरळीत असून काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. यानिमित्ताने सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून मुंबईसह काही ठिकाणी बंडाला हिंसक वळण लागले असल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बस चालक जखमी झाला आहे.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला असला तरी या बंदला काही लोक जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा  हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा डाव असल्याचा  आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे . हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत. बंदच्या दरम्यान काही लोक चेहरा लपवून बंदला हिंसक वळण लावत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावं असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदच्या दरम्यान शांतता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या बंदला औरंगाबाद , सोलापुरात हिंसक वळण मिळालं आहे. सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडल्या आहेत.  मुंबईतील सायन, कुर्ला, चेंबूर या ठिकाणी महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अकोला, पुणे, सोलापूर या ठिकाणीही महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र ज्या ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं नाही. जे लोक बंदला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ते कोणत्या संघटनेचे आहेत हे त्यांना ताब्यात घेतल्यावर लक्षात येईलच असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. सोलापूर शहरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असतानाच हिंसक वळणाने पोलीस सतर्क झाले आहेत. तोडफोड करण्यात आल्यानतंर घटनास्थळी पोलीसांची तुकडी दाखल झाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

बंद दरम्यान गाडीवर दगडफेक,गुन्हा दाखल
औरंगाबाद – पंचवटी हाॅटेल समोर उभ्या असलेल्या जीप वर आज सकाळी ७.३०वा.अज्ञात तरुणांनी दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या या प्रकरणी १० वा. वेदांतनगर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. सी.ए.ए.च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद दरम्यान आज जवाहरकाॅलनी परिसरात मोर्चेकरी दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापार्‍यांना करत आहेत.तसेच शहागंज परिसरात काही व्यापार्‍यांनी दुकाने बंद करुन वंचित आघाडीच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

मुंबईच्या चेंबूर स्वस्तिक पार्क येथे सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस क्रमांक ३६२ धावत असताना बसच्या पुढील काचेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसची मोठी काच फुटली. बस चालक विलास दाभाडे (वय ५३) यांच्या दोन्ही हातांना काचेचे तुकडे लागले. यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाले नाही.

याबाबत पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले कि , आमचा बंद शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आम्हाला तोडफोड करायची असती तर त्याची सुरुवातच हिंसक केली असती. मात्र आम्हाला तसं काहीही करायचं नाही. आमचा बंद हा शांततेच्या मार्गाने सुरु आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे आरोप केले आहेत. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदची हाक देण्यात आली आहे. CAA, NRC, NPR आणि खासगीकरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासून महाराष्ट्र बंद हा शांततेत सुरु होता. त्यानंतर मात्र या बंदला हिंसक वळण लागलं. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता हिंसाचार घडवणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. काही लोक चेहरा लपवून हिंसा घडवत आहेत. या लोकांना पोलिसांनी शोधून काढावं असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

कुठे कसा आहे बंद ?

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद प्रतिसाद मिळाला असून  बंदला बारामतीकरांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. शहरातील बहुतांशी बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या आहेत. वर्ध्यात शुक्रवारी मार्केट बंद राहत असल्याने दुकाने अद्यापही उघडले नसल्याचे चित्र असले तरी जनजीवन सुरळीत आहे. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये बाजार समितीदेखील सहभागी झाली आहे. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची झाली मोठी गैरसोय झाली आहे. अकोला शहरात अल्प प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परीक्षा सुरू असल्याने, शाळा महाविद्यालय बंद नाहीत. वंचितने पुकारलेल्या बंदचा शिर्डीत मात्र कोणताही परीणाम दिसत नाही. साईमंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. साईसंस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालयाबरोबरच शाळा कॉलेज सुरळितपणे सुरू आहे. शहरातील शेकडो हॉटेल्स, फुल प्रसादाची दुकाने प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू असल्याने वंचितने पुकारलेल्या बंदचा शिर्डीत कोणताही परीणाम दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्येही आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!