Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

Spread the love

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ  आपल्या शहराकडे निघालेल्या मध्य प्रदेशातील एका प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे.  काल रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली असून  या प्रकरणातील ४ आरोपींना नेहरु नगर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रात्री ११ च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी निघाली होती. दरम्यान ती साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. त्यावेळी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे झाडीच्या पलिकडे होते. लघुशंकेला बसत असलेल्या महिलेला आरोपींनी ओढून झाडीत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यानच्या काळात दुसरे दोन  आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले हे त्याच ठिकाणावरून दुचाकीवरून जात होते. महिलेचा आरडाओरडा ऐकून त्यांनी पीडित महिलेला मदत करण्याऐवजी त्यांनीही तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. तसेच या पीडित महिलेचे मंगळसूत्र आणि रोख ३००० रुपये घेऊनही आरोपी पळून गेले. हे पाहून एका महिलेने पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून बोलावले. तातडीने दाखल होत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान या पूर्वीही नोव्हेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथून मुंबईत आलेल्या एका महिलेवर तिघांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी दीपू गौतम आणि अब्दुल शेख यांना अटक करण्यात आला होती. त्या पूर्वी चुनाभट्टी स्थानक परिसरातही औरंगाबादहून आलेल्या एका मुलावर बलात्कार करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!