Aurangabad Crime : उधारी मागताच कुर्‍हाडीचे डोक्यात घाव

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – सहा महिन्यापूर्वी मित्राच्या ओळखीने उधार टि.व्ही. नेणार्‍या इसमाने उधारी मागताच पैठणगेट परिसरात बोलावून व्यापार्‍याचे कुर्‍हाडीने डोके फोडले या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सागर हिवाळे(३४) याचे राहूलनगरात इलेक्ट्रॉनिक्स  वस्तूंची दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी सागर हिवाळेचा मात्र अमित सुरडकर याच्या मध्यस्थीने सागर रत्नपारखीने ६ हजार ७०० रुचा टि.व्ही.नेला पण पण सागर पसे  परतफेडीस टाळाटाळ करत होता. शेवटी या व्यवहारातील मध्यस्थाच्या मार्फत सागर हिवाळे नी गुरुवारी रात्री फोन करुन सागर रत्नपारखीला उधारी मागितली तेंव्हा चिडलेल्या रत्नपारखीने खोकडपुर्‍यात फिर्यादीला बोलावून कुर्‍हाडीने फिर्यादी सागर चे डोके फोडले .या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी ३०७ चा गुन्हा दाखल केला. पुढील तपास क्रांतीचौक पो लिस करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार