छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्याची आत्महत्या

Spread the love

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास टर्मिनल २ च्या पार्किंगच्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. अभिषय बाबू असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याने नाव आहे. ते इमिग्रेशन ब्युरोमध्ये ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर पदावर कार्यरत होते. इमारतीवरून उडी मारल्यानंतर जखमी अवस्थेतल्या अभिषय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या उपलब्ध माहिती नुसार परिषय यांना या महिन्याच्या सुरुवातीला नोकरीत बढती मिळाली होती, असे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाबू हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा , या शिवाय त्यांना कामाचा ताण होता का त्याची चौकशी करण्यात येईल, असे  पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार