Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा (ना ) राजीनामा

Spread the love

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अद्याप खात्याचे वाटप रखडलेले असताना काही आमदारांची मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी आहे , काही जण आपल्याला हवे ते खाते पदरात पाडून घेण्याच्या खटपटीत आहेत तर काही जण आपणास राज्यमंत्री केले म्हणून आपापल्या पक्षांवर नाराज आहेत. आ . अब्दुल सत्तार यांनी तर हि नाराजी सहन न झाल्याने थेट आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या  विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सांगण्यात येत आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून काँग्रेस नेतृत्वाशी पंगा घेतल्याने पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकले होते त्यानंतर त्यांनी  सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजप मार्गे शिवसेनेत जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले आणि सिल्लोड विधानसभा पुन्हा जिंकली . त्यांच्या निमित्ताने शिवसेनेला एक आक्रमक  मुस्लिम चेहरा मिळाला, त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री मंडळात राज्यमंत्रिपदाही दिले पण यावरून ते नाराज होते . या प्रकरणात उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!