Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डिजिटल युगात ऑनलाईन आणि डेबिट , क्रेडिट कार्डने साईबाबांना मिळाले २ कोटी ११ लाख तर केवळ ११ दिवसातील देणगी १७ कोटींच्या घरात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या ११ दिवसांत साईबाबांच्या झोळीत तब्बल १६ कोटी ९३ लाख रुपयांचे दान टाकले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये २ कोटी ८८ लाखांची वाढ झाली असून आतापर्यंतची ही विक्रमी देणगी असल्याचे वृत्त आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंबंधी माहित दिली. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० या काळात भक्तांनी दिलेली भेट आणि जमा झालेली देणगी यांचा हिशोब करण्यात आला. या काळात शिर्डीत ८ लाख २३ हजारांहून अधिक भाविकांनी भेट दिली.

Advertisements

सध्या संस्थानकडे २० हजार २८१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ४५५ किलो सोने आणि ५ हजार ५५३ किलो चांदी आहे. याशिवाय १० कोटी रुपयांचे हिरेही आहेत.

Advertisements
Advertisements

मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बायोमेट्रीक दर्शन व्यवस्था, सशुल्क पासेस याद्वारे दर्शन घेतलेल्या भाविकांची नेमकी नोंद होते. याशिवाय ग्रामस्थांसोबत पाहुणे म्हणून आलेले भाविक मात्र वेगळे असतात. या काळात दानपेटीत ९ कोटी ५४ लाख, देणगी काऊंटरवर ३ कोटी ४६ लाख, ऑनलाइन पद्धतीने ७३ लाख, डेबीट, क्रेडिट कार्डद्वारे एक कोटी ३८ लाख, चेकद्वारे १ कोटी ५० लाख अशी देणगी जमा झाली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!