Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : एम.आर. ग्रुपने गुंतवणूकदारांना घातला ४५ लाखांचा गंडा , चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : एम.आर. ग्रुपच्या फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना ४५ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जुनेद खान जावेद खान, उबेद खान जावेद खान, दोघे राहणार मंजूरपुरा, जैद खान इजहार खान, अय्याज खान इजहार खान, दोघे राहणार औरंगाबाद अशी गुंतवणूकदारांना गंडा घालणा-यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुल हसनअली खुर्रमअली हाश्मी (वय ३६, रा.दिलरस कॉलनी, प्लॉट नंबर ७, हिमायतबाग परिसर) यांनी एम.आर.ग्रुपच्या फर्ममध्ये २५ लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. तसेच मोहमंद अली खान एमादुल हक खान (वय ३९, रा.शहाबजार) यांनी देखील एम.आर.ग्रुपमध्ये २० लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. सुरूवातीच्या काळात एम.आर.ग्रुपने त्यांना परतावा दिला होता. परंतु नंतर परतावा देणे बंद केले होते.

याप्रकरणी अबुल हसनअली हाश्मी यांच्या तक्रारीवरून फसवणूक करणा-या चौघांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!