Aurangabad Crime : निवृत्त पोलिस निरीक्षकाला १० लाखाला गंडविले, भामटा अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : तुम्हाला शासनमान्य देशी दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देतो असे आमिष दाखवून निवृत्त पोलिस निरीक्षकाला १० लाख रु.ना बुलढाण्याच्या व्ही.आर.एस. घेतलेल्या शिक्षक भामट्याने गंडवले.त्याला सिडको पोलिसांनी शनिवारी बुलढाण्याहून बेड्या ठोकून आणले.

Advertisements

बहादुरसिंग रामसिंग राजपुत (५८)(रा.गोकुळधाम, बुलढाणा रोड, ता.मलकापुर, जि.बुलढाणा)असे भामट्याचे नाव आहे. या राजपूतने जुन्या ओळखीचा फायदा घेऊन निवृत्त पोलिस निरीक्षक रमेश मुंढे यांना मंत्रालयातून देशी दारु विक्रीचा परवाना मिळवून देण्याकरता १० लाख रू.२०१६साली घेतले होते.हा परवाना मुंढे यांना पत्नीच्या नावे घ्यायचा होता.

Advertisements
Advertisements

जुनी ओळख असल्यामुळे मुंढेंनीही आढेवेढे न घेता १०लाख रु. राजपूतला तीन वर्षांपूर्वी १०आॅगस्ट२०१६ रोजी दिले पण रक्कम  मिळताच राजपूत ने मुंढेंशी संपर्क ठेवला नव्हता.तेंव्हा मुंढेंनी पैसे परत मागितले.पण परत  मिळंत नसल्याचे लक्षात येताच मुंढे यांनी त्यांच्या पत्नीला सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.

पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

आपलं सरकार