Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : सिग्नलवर उभ्या ट्रकला कंटेनर पाठीमागून धडकला, देवळाई चौकातील घटना

Spread the love

औरंंंगाबाद : बीडबायपास रोडवरील देवळाई चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने धडक दिली. हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडला. कंटेनरची धडक इतकी भिषण होती की, कंटेनरच्या कॅबीनचा पार चक्काचूर झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
सातारा परिसरातील रहिवासी असलेले ट्रकचालक मुशीर खान यासीन खान (वय ५०) यांनी चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथून ट्रक क्रमांक (एमएच-२०-एफ-५३५४) मध्ये लाकडाचा भूसा भरून दौलताबादकडे जात होते. देवळाई चौकात सिग्नल लागला असल्यामुळे त्यांनी आपला ट्रक थांबविला होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला सिमेंटने भरलेला कंटेनर क्रमांक (एमएच-२६-एडी-०५६७) ने समोर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. अचानक बसलेल्या धडकेमुळे मुशीर खान यांचा ट्रक पुढे गेला असता कंटेनरने पुन्हा एकदा पाठीमागून धडक दिली.
या अपघातात कंटेनरच्या कॅबिनचा पार चक्काचूर झाला असून कंटेनर चालक आणि किन्नर हे थोडक्यात बचावले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या चुकीमुळे घडला अपघात
देवळाई चौकात अपघात घडला त्यावेळी सातारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या वेंâद्रीय पोलिस दलाच्या जवानांसोबत रोडमार्च करीत होते. त्यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अचानकपणे ट्रकला थांबविल्यामुळेच अपघात झाला असल्याचा आरोप कंटेनरचालकाने केला असल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!