रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीचा वापर करु देण्यास पाकिस्तानने परवानगी नाकारली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने भारताची विनंती फेटाळून लावली आहे.

Advertisements

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांसंदर्भात ते या देशाच्या प्रमुख नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत.

Advertisements
Advertisements

काश्मीरवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यापार्श्वभूमीवर इम्रान खान यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे असे कुरेशी यांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.

आपलं सरकार