Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

श्रीलंका सरकारकडून संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी : पुन्हा हल्ल्याची धमकी , दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येण्याची शक्यता !

Spread the love

श्रीलंकेत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून हि बंदी आज सोमवारपासून  लागू राहील असे आदेश जारी  करण्यात आलेआहेत.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी हा निर्णय जाहीर केला असून या आदेशात  मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं सिरिसेना यांनी म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘कोणत्याही प्रकारे चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ओळख पटण्यावर अडचण होईल असा कोणत्याही प्रकारे चेहरा झाकू शकत नाही. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे श्रीलंका सरकारनं स्पष्ट केले आहे. साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ISISने घेतली होती. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती. अखेर त्यावर निर्णय घेत नकाब आणि चेहऱ्यावर कपडा बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे.

श्रीलंकेत पुन्हा हल्ल्याची धमकी, दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येण्याची शक्यता !

दरम्यान  श्रीलंकेतील कोलंबो शहरात इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून येथे हल्ला होण्याची शक्यता श्रीलंकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. हे दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येऊन हल्ला करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांनी आणि दोन विरोधी पक्ष नेत्यांनी हल्ल्याच्या या इशाऱ्याला पुष्टी दिली आहे. संसदेत या संभाव्य हल्ल्यासंबंधी माहितीही देण्यात आली आहे.

मिनिस्टिरिअर सिक्युरिटी डिव्हीजनच्या (एमएसडी) प्रमुखांनी सांगितले की, इथे आणखी काही हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. एमएसडी पोलिसांचे युनिट, खासदार आणि सुरक्षेशी संबंधीत दुसऱ्या एजन्सीजला पत्र लिहून ही माहिती देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, हल्लेखोर सैन्याचा गणवेशात घालून येऊ शकतात. यामध्ये हे देखील म्हले आहे की, दहशतवादी गेल्या रविवारीच आणखी पाच ठिकाणांवर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी अशी कोणतीही घटना घडली नाही, त्यामुळे त्यांनी यापुढेही अशीच काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.

दरम्यान, एनआयएने रविवारी आयसिसच्या कासरगोड मॉड्यूलची चौकशी करताना केरळमध्ये तीन जागी छापेमारी केली होती. कासरगोड आणि पालक्कड येथील चार संशयीतांच्या घरावर छापे मारून ही कारवाई करण्यात आली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!