Abhinandan : पाकिस्तानी वीणा मलिकला “तार” स्वरात उत्तरली स्वरा भास्कर

Spread the love

पाकिस्तानच्या ताब्यात असलेलेले  भारतीय पायलट अभिनंदन वर्धमान यांच्या संदर्भात अतिशय असंवेदनशील ट्विट करण्याऱ्या वीणा मलिकला भारतीय अभिनेत्री स्वरा भास्करने  सडेतोड उत्तर देत आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “वीणा जी… तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमची मानसिकता अतिशय खालच्या दर्जाची आहे. आमचे ऑफिसर हे अतिशय शूर असून ते हिरो आहेत. अनेक पाकिस्तानी शांततेची मागणी करत आहे. एवढेच नव्हे तर आमच्या ऑफिसला प्रश्न विचारणाऱ्या तुमच्या आर्मीतील मेजरने देखील सभ्यता दाखवली.”

वास्तविक पाहता केवळ भारतातील लोकांनीच नव्हे तर पाकिस्तानमधील लोकांनी देखील सोशल मीडियाद्वारे अभिनंदन यांना सुखरूपपणे पाठवून द्यावे अशी मागणी केली आहे. पण या सगळ्यात अभिनेत्री वीणा मलिकने अभिनंदन यांचा फोटो ट्वीटरवर शेअर करून अभी अभी तो आये हो… अच्छी मेहमान नवाझी हो गी आप की… (तुम्ही आताच तर आला आहात… तुमचा चांगलाच पाहुणचार होईल) असे ट्वीट केले आहे. असे असंवेदनशील ट्वीट केले होते त्याला भारतीय अभिनेत्री स्वरा भास्करने अतिशय  तार स्वरात उत्तर दिले आहे. हि तीच वीणा मलिक आहे जी भारतीय बिग बॉस या कार्यक्रमात झळकली होती. आणि  अनेक महिने भारतातच राहिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *