It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

शाळकरी मुलींचा लैंगिक छळ : मुख्याध्यापक फरार

file pic

file pic

Spread the love

२१ मुलींच्या लैंगिक छळाची तक्रार : सोयगाव तालुक्यातील जरंडी गावातील घटना

औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब घेत मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाविरोधात २१ विद्यार्थिनींनी जबाब दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून शाळेतील मुख्याध्यापक अश्लील भाषेचा वापर करुन बोलत होता, असा आरोप या मुलींनी केला आहे. या सर्व मुली सहावी ते आठवी या तीन वर्गातील आहेत.

मुलींनी हा प्रकार घरी सांगितला असता बुधवारी सकाळी पालकांनी शाळा गाठली. यानंतर पालकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे हे देखील शाळेत पोहोचले. त्यांनी २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला. या प्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रार दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाला आहे.