Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी पुनाळेकर आणि भावे यांना न्यायालयीन कोठडी

Advertisements
Advertisements
Spread the love

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनीही त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यांच्या जामीन अर्जावर येत्या ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पुरेशी पोलीस कोठडी देऊनही तपासात कोणतीही प्रगती न झाल्याचे ताशेरे ओढत विशेष न्यायाधीश आर.एम. देशपांडे यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकिलाने लगेचच जामिनासाठी अर्ज केला असून या जामीन अर्जावर येत्या ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.
नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!