Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी १० जूनपर्यंत सुनावणी तहकूब, आरोपींच्या पीसीआरसाठी सरकारी वकील हाय कोर्टात

Advertisements
Advertisements
Spread the love

डॉ. पायल तडवीआत्महत्येप्रकरणी तिन्ही डॉक्टरांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने गुन्हे शाखेला उत्तर देण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पायलच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी या तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या तिघींनाही १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी या तिघींना जामीन मिळावा म्हणून कोर्टात जामीन अर्ज सादर केला होता, त्यावर न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देतानाच याप्रकरणावरील सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली आहे.
दरम्यान, आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल यांची पोलीस कोठडीत चौकशी करता यावी यासाठी पोलिस कोठडी मिळवण्याकरिता गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणावर तातडीची सुनावणी करण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून परवा गुरुवारी याप्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!