Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जिथे पैसे सापडले त्याच हाॅटेलमधून विनाेद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Advertisements
Advertisements
Spread the love

नालासाेपारा : ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी भाजपचे वरिष्ठ नेते विनाेद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आराेप झाला असून बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनीच सगळाच प्रकार समाेर आणला आहे. पण ’’मी इथं मतदानाच्या आदल्यादिवशी काय काम करायचं असतं, याची माहिती देण्यासाठी इथं आलाे हाेताे’’ अशी पहिली प्रतिक्रिया विनाेद तावडेंनी दिली.

विरारमधील हाॅटेल विवांतमध्ये भाजपचे नेते विनाेद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित हाेते. त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले. यावेळी पैसे वाटप केल्याचं समाेर आलं आहे.

Advertisements

’’आज नालासाेपारामध्ये वाडावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक हाेती. मतदानाच्या दिवशी काय नियमावली असते हे सांगण्यासाठी मी इथं आलाे हाेताे. आमच्यासमाेरच्या मित्रपक्षाला वाटलं की मी पैसे वाटण्यासाठी इथं आलाे. आप्पा ठाकूर, क्षितीज ठाकूर इथं आले. त्यामुळे माझं म्हणणं आहे की, सीसीटीव्ही कॅमेरे आहे. निवडणूक आयाेगाने याची चाैकशी करावी. मतदाराच्या दिवशी कुठे सही करायची, काय करायचं असतं हे सांगण्यासाठी इथं आलाे हाेताे.

Advertisements
Advertisements

’आमचे मित्र पक्ष आहे, हितेंद्र ठाकूर आहे. क्षितीज ठाकूर आहे, त्यांना वाटलं मी पैसे वाटण्यासाठी इथं आलाे आहे. निवडणूक आयाेगाने त्याची चाैकशी करावी, पाेलिसांनी चाैकशी करावी. मी गेल्या 40 वर्षांपासून पक्षामध्ये आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. जे वास्तव आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा निवडणूक आयाेगाला जी काही चाैकशी करायची आहे, ती करावी’ असंही तावडे म्हणाले.

विरारमध्ये नेमकं काय घडलं?

क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घूसून विनाेद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिाे सापडले हाेते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिाे उघडून पैसे दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हाेता.त्याचसाेबत या बॅगेतून लॅपटाॅप आणि काही डायèया देखील सापडल्या आहेत. हे संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेऊन आता क्षितीज ठाकुरांनी विनाेद तावडेंवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखर झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुान राडा झाला आहे.

हितेंद्र ठाकुरांचा गंभीर आराेप

या संपूर्ण घडामाेडीवर हितेंद्र ठाकुर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. पाच काेटी वाटप हाेतायत.त्यात अनेक लॅपटाॅप,डायèया मिळाल्या आहेत. हे राष्ट्रीय नेते,राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम काहीच नाही सगळं घाेलुन प्यायले आहे, अशी टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विनाेद तावडेंनी मला 25 ाेन केले..मा\ करा, मला जाऊ द्या असे हितेंद्र ठाकुरांनी म्हणत पाेलिसांनी कारवाई करावी, निवडणूक आयाेगाने कारवाई करावी,अशी मागणी हितेंद्र ठाकुरांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!