तारापूर MIDCमध्ये वायुगळतीत ३ जणांचा मृत्यू

बोईसरमध्ये तारापूर एमआयडीसीत एका रासायनीक कारखान्यात झालेल्या वायू गळतीत तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना डॉक्टरानांही वायुगळतीची बाधा झाल्याने त्यांना आयसीसीयुमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील इतर कारखाने रिकामे केले आहे. वायुगळीतील घटनेत १ व्यवस्थापक १ ऑपरेटर व १ हेल्परचा मृत्यू झाला आहे.
बोईसर एमआयडीसीत प्लॉट नं. एन ६० मधील स्क्वेअर केमिकल या रासायनिक कारखान्यात रविवारी केमिकल रिएक्शनची बाधा होऊन तिघांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्याची बाधा होऊन त्यांना आयसीयुमध्ये दाखल केलं आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी आजूबाजूच्या कारखान्यातील कामगारांना बाहेर काढून संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
आज दुपारी ३. ४५ वाजण्याच्या सुमारास कारखान्यातील आरएम २ या स्टोरेज टँक मध्ये सोलवंट भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक स्टोरेज टँक फाटला. यामुळे रसायन बाहेर पडून विषारी धूर आणि विषारी वायूची बाधा कर्मचाऱ्यांना झाली. यात कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे (५९ वय), ऑपरेटर दत्तात्रय घुले (२५ वय), व हेल्पर रघुनाथ गोराई (५० वय), या तिघांना विषारी वायूची बाधा झाली. यात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. या तिघांनाही बोईसर एमआयडीसीमधील तुंगा रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरांना त्यांच्या अंगावरील कपड्यांमुळे वास व वायूचा त्रास जाणवू लागला. यामुळे त्यांनाही आयसीसीयुमध्ये दाखल करून उपचार करावे लागले. मात्र त्या डॉक्टरांचे नाव सांगण्यास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. सदर घटना घडली तेव्हा कारखान्यात ४ हेल्पर काम करत होते. त्या पैकी एकाचा मृत्यू झाला.