इंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर राजद नेते लालूप्रसाद यादव यांची साथ सोडली. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र 75 वर्षाच्या लालूप्रसाद यादव यांनी अनेक व्याधींवर मात करून पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाली. इंडिया आघाडीसाठी हे शुभसंकेत मानले जात आहेत.
लालूप्रसाद यादव यांनी आज बिहारमध्ये इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली होती. इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅली होती. या रॅलीचा कोणताच गाजावाजा करण्यात आला नव्हता. त्यामुळे ही रॅली यशस्वी होणार नाही, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात होते. पण लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीला 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाली होती. इंडिया आघाडीसाठी हे शुभसंकेत मानले जात आहेत.
पटनाच्या गांधी मैदानावर इंडिया आघाडीच्या जन विश्वास महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरजेडीने ही रॅली आयोजित केली होती. देशातील इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅली होती. लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सपा नेते अखिलेश यादव, डी. राजा आणि सीताराम येचुरी आदी नेते या महारॅलीत सामील झाले होते. या रॅलीला 15 लाखाहून अधिक लोक जमल्याचे वृत्त आहे.
नीतीश कुमारांना धक्का देणार ते पलटूराम आहेत
या रॅलीतून लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी लालूंनी केंद्रातील भाजपच्या कारभारावरही हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी नाव न घेता नीतीश कुमार यांना चांगलीच समज दिली. आता त्यांनी दुसऱ्यांदा येऊन तर पाहावे. चांगलाच धक्का देऊ. 2017 मध्ये जेव्हा नीतीश कुमार महाआघाडीतून एनडीएत गेले तेव्हा आम्ही त्यांना शिव्या दिल्या नाही.
ते पलटूराम आहेत, असे आम्ही म्हणालो होतो. त्यानंतरही आम्ही त्यांना महाआघाडीत घेतले. आमची चूक झाली, माझ्याकडून आणि तेजस्वीकडून चूक झाली. पण आता ही चूक होणार नाही, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.
नरेंद्र मोदी अजिबात हिंदू नाहीत
यावेळी त्यांनी मोदींवरही टीका केली. हे मोदी.. कोण आहेत मोदी? मोदी एखादी वस्तू आहे काय? नरेंद्र मोदी अजिबात हिंदू नाहीत. आईचा मृत्यू झाल्यावर दाढी, केस कापण्याची हिंदूंमध्ये परंपरा आहे.
मोदींनी ही परंपरा का पाळली नाही? त्याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे आव्हानच त्यांनी दिले. बिहारमध्ये जे घडतं, त्याचं अनुकरण देश करतो. बिहारच्या हवेतच दम आहे, असा दावाही त्यांनी केला.
दलित, मागासांना अधिकार दिले
नव्वदच्या दशकात दलित, आदिवासी आणि ओबीसींना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. त्यावेळी सामंतशाह असायचे. व्होट आणि बूथ दोन्ही आपल्या दरवाजात ते ठेवायचे.
मागास समाजाची मते लुटता यावीत म्हणून ते असे करायचे. अशा लोकांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. लोकांना बळ देण्याचे काम केले. नव्वदच्या दशकातच आम्ही या छोट्या छोट्या जातींचे गांधी मैदानात संमेलन भरवले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली या वेळी सांगितली.
नेता वही "ख़ास" है जिसके साथ "जन विश्वास" है
गाँधी मैदान में आज बिहार की महान जनता ने महा-परिवर्तन के संकल्प पर मोहर लगा दी है।जिस सपने और संकल्प को लेकर इस जनविश्वास महारैली के लिए आप सभी अपने-अपने घरों से निकले थे, वह सारे सपने और संकल्प आप सबों के पूर्ण रूप हो! #LaluYadav… pic.twitter.com/bnzoHTgRQP
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) March 3, 2024
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765