Maratha Reservation : अखेर मनोज जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल…

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याने पोलिसांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र आता पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

Advertisements

कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल ?

जरांगे यांच्यावर कलम ३४१, १४३, १४५, १४९, १८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रास्ता रोको करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे, शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. बीडमध्ये इतर २५ ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

उपोषण स्थगित, जरांगे रुग्णालयात

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करून उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. आता धरणे आणि साखळी उपोषण करा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

दरम्यान, अशक्तपणा आणि अतिसार आणि अन्य त्रास होत असल्याने चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेच उपचार घ्यावे लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!