Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बघा कोणत्या नेत्यांना मिळाली उमेदवारी

Spread the love

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली.

भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खलभाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता.

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते.  त्यानंतर आज अखेर भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?

  • वाराणसी – नरेंद्र मोदी

  • गांधीनगर – अमित शहा

  • गुना – ज्योतिरादित्य शिंदे

  • विदिशा – शिवराज सिंह चौहान

  • बीकानेर – अर्जुन राम मेघवाल

  • जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत

  • बाडमेर – कैलाश चौधरी

  • झालावाड – दुष्यंत सिंह

  • भोपाळ – आलोक शर्मा

  • कोटा – ओम बिर्ला

  • अलवर – भूपेंद्र यादव

  • अंदमान निकोबार – विष्णू पडा

  • अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू

  • अरुणाचल पूर्व – तपिर गावो

  • आसाम सिलचर – परिमल शुक्ल

  • वैद्यगुवाहाटी – बिजुली

  • कलितातेजपुर – रणजित

  • दत्तानौगाव – सुरेश बोरा

  • दिबृगड – सर्वानंद सोनोवाल

  • छत्तीसगड विलापसुर – तोखन साहूराज

  • नंदगाव – संतोष पांडे

  • रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल

  • बस्तर – महेश कश्यप

  • दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल

  • दिल्ली चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल

  • उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी, बांसुरी स्वराज

  • दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी

  • उत्तर गोवा – श्रीपाद नाईक

  • गांधीनगर – अमित शाह

  • राजकोट – पुरुषोत्तम रुपाला

  • पोरबंदर – मनसुख मांडवीय

  • नौसारी – सी. आर पाटील

  • जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग

  • कोडरमाल – अन्नपूर्णा देवी

  • हजारीबाग – मनीष जैस्वाल

  • केरळ कासरगोड – एम एल अश्विनी

  • कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण

  • कोझिकोडे – एम टी रमेश

  • त्रिशुर – सुरेश गोपी

  • अल्पुझा – शोभा सुरेंद्र

  • अटींगल – वी मुरलीधरन युवराज सिंग,

दरम्यान, अक्षय कुमारही भाजपच्या तिकीटावर निवडणूक असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही सेलिब्रिटींनाही उमेदवारी देणार असल्याचे वृत्त आहे.

लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.

तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून विद्यमान खासदारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली होती. लोकसभेच्या एका जागेसाठी दोन ते तीन नेत्यांचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवाराची निवड करण्यात आली.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!