आपचे नेते गुरप्रीत सिंग गोपी यांची, त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

पंजाबच्या तरनतारनमधून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथे आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ ​​गोपी चोला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा हल्ला झाला तेव्हा ते तरणतारन अंतर्गत गोइंदवाल साहिब रोडवर रेल्वे फाटक उघडण्याची वाट पाहत होते.

Advertisements

त्यानंतर एका कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नफे सिंह राठी हत्याकांड प्रमाणे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

घटनेच्या वेळी गुरप्रीत सिंग गोइंदवाल साहिबला जात होते. तेथे एका खटल्यात ते न्यायालयात हजर होते. गोइंदवाल साहिब येथे जात असताना रेल्वे फाटक बंद असल्याने ते त्यांच्या गाडीत गेट उघडण्याची वाट पाहत बसले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर काही हल्लेखोर स्विफ्ट कारमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

काही दिवसांपूर्वी हरियाणातील बहादूरगडमध्ये INLD नेते नफे सिंग राठी यांची अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!