Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आसाराम बापूंची आयुर्वेदिक उपचाराची याचिका न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळली

Spread the love

लैंगिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील रुग्णालयात उपचारासाठी आसारामला राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

महाराष्ट्रात पोलीस कोठडीत असताना आसाराम यांनी आयुर्वेदिक उपचाराचीही मागणी केली होती, त्यावर न्यायालयाने त्यांना राजस्थान उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

आसाराम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका मिळाला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आसाराम बापूंच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

खरे तर, आसारामला पोलिस कोठडीऐवजी स्वत:च्या इच्छेने उपचार करू दिले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगत उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्याचा चौथा अर्ज फेटाळला होता.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!