Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रियंका गांधी वाड्रा यांची प्रकृती खालावली… या कारणामुळे भारत जोडो न्याय यात्रेत उपस्थित नसल्याचे केले स्पष्ट

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील चंदौली येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहू शकल्या नाहीत यामुळे अनेक तर्क लावण्यात येत होते. आता पोस्ट करून त्यांनी सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते, पण आजारी असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

Advertisements

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील चंदौली येथे भाऊ राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला डिहायड्रेशन आणि मळमळ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

त्यांनी X वर (Twitter) लिहिले की त्या आजारी आहेत आणि जेव्हा बरे वाटेल तेव्हा या यात्रेत सामील होईल. “भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, पण डिहायड्रेशनमुळे मला आज रुग्णालयात दाखल करावे लागले. मला जसे बरे वाटेल, मी यात्रेत सामील होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व प्रवाशांना, माझ्या सहकाऱ्यांना आणि उत्तर प्रदेशातील प्रिय बंधू जे प्रवासाची तयारी करत आहेत, त्यांना मी शुभेच्छा देते. असे सांगितले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!