धक्कादयक, माणूस कसा मरतो हे पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली निर्घृण हत्या

बिहारमधल्या मधुबनमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी कॅब चालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलांनी सोशल मीडियावर कसे मारायचे हे पाहिले होते. या मुलांना फक्त माणसाला मरताना बघायचे होते आणि मरण्यापूर्वी त्याला कसे त्रास सहन करावे लागतात हे पहायचे होते यामुळे त्यांनी हा खून केला असल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8वी, 9वी आणि 11वीत ही तीनही मुलं शिकतात. बहिणीची पाठवणी करण्याचे कारण देत या तीन मुलांनी मंगळवारी रात्री एक एसयूव्ही कार बूक केली. संशय येऊ नये म्हणून चांगले कपडे घालून ही तीनही मुल कारमध्ये बसली. रस्त्यात सुनसान जागा येताच या तिघांनी ड्रायव्हरला कार थांबवण्यास सांगितले.
ड्रायव्हर तडपत असताना मुलं जोरजोरात हसत होती
ड्रायव्हरने कार थांबवल्यानंतर मागे बसलेल्या दोघांनी ड्रायव्हरचा गळा रशीने आवळला त्यानंतर पुढे बसलेल्या मुलाने ड्रायव्हरच्या गळ्यात खिळे घुसवले. जो पर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत मुलांनी रशीाच फास आवळून धरला. ड्रायव्हर तडपत असताना मुलं जोरजोरात हसत होती, असा कबुलीजबाबही त्यांनी पोलिसांना दिला आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी मुलांनी धक्कादायक कबुली दिली आहे. ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी जितका धडपडत होता तितका आपल्याला आनंद होत होता, त्याला मरताना पाहून मुलांना मजा वाटत होती, असे आरोपी मुलांनी सांगितंले.
त्या ड्रायव्हरबरोबर मुलांची कोणतीही दुश्मनी नव्हती. पण केवळ माणूस कसा मरतो हे पाहण्यासाठी या मुलांनी निष्पाप कॅब ड्रायव्हरची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुलांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्याचे आदेश कोर्टाने दिले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765