राज्यातल्या ६ जागांसाठी ७ उमेदवारांनी भरले अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या ६ जागांसाठी ७ उमेदवारांनी अर्ज भरले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल की नाही हे अर्ज छाननी नंतर स्पष्ट होणार आहे.
भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपछडे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरले आहेत. यांच्याशिवाय पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765