NashikNewsUpddate : अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नागरसेवकाचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिक : भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवक बाळु मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती.

Advertisements

याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला होता.

Advertisements
Advertisements

माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लाऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता, त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेरात कैद झाले आहे.

चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं. आनंदवाडी, शिंदी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला ? हे अद्याप समोर आलेलं नाही.

या प्रकरणी चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये या घटना घडल्या. या तीन घटनेत दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे.


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!