अखेर हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री….

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : अखेर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Advertisements

जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून गेल्या चार दिवसांपासून हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील.

Advertisements
Advertisements

हेमंत सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता.

दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

ईडीने (ED) या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे, ज्यात 2011 च्या बॅचच्या IAS अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे, ज्यांनी राज्य समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीचे उपायुक्त म्हणून काम केले होते.

या प्रकरणात झारखंड जमीन महसूल विभागाचे कर्मचारी भानू प्रसाद प्रसाद यांनाही एजन्सीने अटक केली होती. सोरेन यांनी २०१२ ते २०१४ पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. या काळात त्यांनी माफियांकडून जमिनी मिळवून त्यांचे नातेवाईकांना दिली असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!