SharadPawarNewsUpdate : अजित पवारांच्या बॉम्बची पवारांनी उडवली अशी खिल्ली …

पुणे : काल अजित पवार यांनी पहिल्यांदा आपण राष्ट्रवादीतून बाहेर का आणि कसे आलो ? याविषयी अनेक गौप्यस्फोट केले . त्यावर शरद पवार के बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते . मात्र आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविताना , त्यातील काही गोष्टी मला पहिल्यांदा समजल्या. त्यात बॉम्ब होता का? स्फोट होता का? याचा अभ्यास करावा लागेल असे उद्गार काढले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की , मी कुणाला देखील बोलावलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष असल्यानं अनेकांशी सुंसवाद ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. काही सहकारी ज्या रस्त्यानं जाण्याचा विचार करत होते, तो मुद्दा आम्हाला किंवा जनमानसात आम्ही जे शब्द दिले होते त्यांच्याशी सुसंगत नव्हता. भाजप आणि तत्सम प्रवृत्ती विरोधात आमची भूमिका होती. आमचे लोक जे निर्वाचित झाले त्यांना भाजप विरोधी मतं मिळाली होती. जाहीरनामा मांडला होत्या त्यापेक्षा विपरित काम करावं, असं लोकांना मान्य होणार नव्हती, असं शरद पवार म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेच्या बाबत आमची वेगळी भूमिका आहे. आम्ही जेवढे भाजप विरोधात आहे तेवढा विरोध शिवसेनेला नव्हता. भाजपला आम्ही पाठिंबा दिला होता हे सांगतात ते मंत्रिपदाची शपथ घेऊन सांगतात, असं शरद पवार म्हणाले.
आमची भूमिका होती, भाजपसोबत जायला नको..
मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो, सामूहिक निर्णय झालेला होता. आमची भूमिका होती, भाजपसोबत जायला नको, असं सांगून शरद पवार म्हणाले. अनिल देशमुख यांनी देखील काल स्पष्ट केलं की त्यांनी या मार्गानं आपल्याला जायचं नव्हतं अशी भूमिका मांडली होती.
मला स्वत:ला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे…
दरम्यान मी राजीनामा दिल्यानंतर तो मागं घेण्यासाठी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगायची गरज नव्हती. मला स्वत:ला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आमच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या पण राजीनामा देतो, अशी चर्चा झाली नव्हती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
संसदीय लोकशाही पद्धतीत कोणत्याही मतदारसंघात कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन मतदारांपर्यंत जाऊ शकतो. जर त्यांनी निवडणूक लढवली तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले.