MarathaReservationNewsUpdate : कोणत्या जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी किती ? शोध मोहिमेचे काम युद्ध पातळीवर …

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेल्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीच्या शोध मोहिमेत गेल्या 15 दिवसांत 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या असल्याचे वृत्त आहे. यातील सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलनाचे काम सुरू आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रात सापडलेल्या बहुतेक नोंदी नव्या आहेत.
आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक तर ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून आठ कोटी 99 लाख 33 हजार 281 नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या 29 लाख एक हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत 13 लाख ३ हजार 885 नोंदी सापडल्या आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी 118 कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू आहेत.
मराठवाड्यात आढळलेल्या नोंदी
बीड जिल्हास्तरीय समितीला मराठवाड्यात सर्वाधिक ११,१२७ नोंदी आढळल्या आहेत. तर, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत १२,६०१ नोंदी आढळल्या आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बेमुदत उपोषण सुरु केल्यानंतर शासनाने मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा वेळ मागून मराठा- कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. आता या समितीची कार्यकक्षा महाराष्ट्र केल्यामुळे राज्यभर हि शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
या शोध मोहिमेनुसार निजामकालीन दस्तऐवजांत तसेच जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमुना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा नोंदी आहेत. या नोंदींच्या तपासणीसाठी शासनाने जिल्हा स्तरांवर निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (होम), अधीक्षक भूमि अभिलेख, अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून या नोंदींची तपासणी केली जात आहे.
पाहणीत गुरुवार (ता. १६) अखेरपर्यंतच्या अहवालात मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११,१२७ मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या खालोखाल हिंगोली जिल्ह्यात ३४६४ तर, जालना जिल्ह्यात ३२५१, परभणी जिल्ह्यात २०४१, धाराशीव जिल्ह्यात १२१५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०६५, नांदेड जिल्ह्यात ८७८, तर लातूर जिल्ह्यात ६८३ नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातील उर्वरित आठ जिल्ह्यांतील नोंदीच्या संख्येच्या प्रमाणात एकट्या बीड जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
सर्वाधिक प्रमाणपत्रे उस्मानाबाद जिल्ह्यात
शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटपही सुरु केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११४ तर औरंगाबाद जिल्ह्यात १०४ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. बीड ४७, जालना १९, परभणी १७, हिंगोली १८, नांदेड २२ व लातूरला १९ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दरम्यान गेवराई तालुक्यात सर्वाधिक नोंदी आढळल्याचे अहवालातून समोर येत आहे. त्याखालोखाल बीडचा समावेश आहे. परळी तालुक्यात एकही नोंद आढळलेली नाही.