Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : कारवाईच्या भीतीने ८०० कोटींचे अंमली पदार्थ सोडून ते पळाले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ  जप्त केले आहे. समुद्रकिनाऱ्याजवळून त्यांनी सुारे 80 किलो ड्रग्स ताब्यात घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत सुमारे 800 कोटी  रुपये असल्याचे समजते. खबऱ्यांकडून यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत तपास सुरू केला. पोलिसांची धाड पडताच ड्रग्स तस्कर अमली पदार्थांची पॅकेट्स तिथेच टाकून फरार झाले. गुजरातमध्ये या आधीही बंदरावर कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळून आले होते. 

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ही कारवाई करण्यात आली. समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात 80 किलोपेक्षा जास्त वजनाचा अंमली पदार्थांचा हा माल बेवारस अवस्थेत पडलेला आढळला. एफएसएलच्या प्राथमिक तपासात हे कोकेन असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

गांधी धाम शहराजवळील खाडी किनारी सुमारे 80 पॅकेट्समध्ये कोकेन सापडले. या प्रत्येक पॅकेटचे वजन साधारण एक किलो तरी आहे. पोलिस या ठिकाणावर सतत लक्ष ठेवून होते. छापा पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने ड्रग्स तस्करांनी सर्व माल तिथेच टाकला आणि ते फरार झाले असे कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत खबऱ्यांतर्फे आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही पथक तैनात करून शोधमोहीम तीव्र केली. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये आम्ही समुद्र किनाऱ्यावरून कोकेनची 80 पाकिटे जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.

मात्र गुरुवारी गांधीधामजवळ जप्त करण्यात आलेल्या पॅकेट्सचा पूर्वी सापडलेल्या ड्रग्स्च्या पॅकेटशी काहीही संबंध नसल्याते बागमार यांनी स्पष्ट केले. ही पॅकेट्स अलीकडेच जप्त करण्यात आली असावीत. आम्ही माहितीनंतर ज्यांचा मागोवा घेत होते, त्याच मालाचा ही पाकिटे भाग असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वीही जप्त केला होता मोठा साठा

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर एजन्सींनी गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानजवळील जाखाऊजवळच्या किनाऱ्यावरून अनेक वेळा हेरॉईन आणि कोकेनने भरलेली पॅकेट जप्त केली होती. तेथे तपास केल्यावर पकडले जाऊ नये म्हणून तस्करांनी ड्रग्जची अनेक पाकिटे समुद्रात फेकून दिली. मात्र नंतर ती किनाऱ्यावर वाहून आल्याचे आढळले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!