Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : “ अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, पडळकरांची टीका…

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे वाद सार्वशृत असताना त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया पवार यांच्यावर टीका करताना, “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे ”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका पडळकर यांनी केली असून यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली.

Advertisements

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

“अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!