BJPNewsUpdate : इंडिया आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका , मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळे करू शकत नाही….

मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना , काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा करतात. उद्धव ठाकरे याविषयी बोलतात याचे मला आश्चर्य वाटत नाही. कारण, निवडणुकीच्या तोंडावर ते नेहमीच अशी भाषा करतात. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळे करू शकत नाही. असे करण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे ठणकावून सांगितले.
महायुतीच्या बैठकीनंतर बोलताना फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यांनी कधीच मुंबईचा विकास होऊ दिला नाही. कायम मराठी माणसात भय ठेवले. मुंबईच्या विकासाला जो विरोध करतो तो महाराष्ट्रद्रोही आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुंबईचा आता खरा विकास होतोय. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला पण आता कोणी बाहेर जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ममता दीदींना बसायला खुर्ची दिली नाही …
विरोधकांच्या बैठकीत ममता दीदी आल्या आहेत, त्यांना बसायला खुर्ची दिली नाही. त्यामुळे त्या रागाने निघून गेल्या. त्यांना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत. पवारांनी अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते पण थांबले नाही. विरोधक जेव्हा एखाद्याचे मन वळवू शकत नाहीत तेव्हा ते कन्फ्युज करण्याचे काम करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचे सर्व मित्रपक्ष फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही. इथे कुणालाच प्रश्न पडला नाही की आमची जाग नेमकी कुठे आहे? असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण?
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी आहेत. तुमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण आहेत? रोज नवीन नावे समोर येत आहेत. पण ज्यांनी बैठकीचे आयोजन केले त्यांचे नाव येतच नाही. इंडिया आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे. लोगो तयार करणार होते पण लोगो सुद्धा आला नाही. रंग कोणता? 36 पक्ष कोणते? प्रत्येकाचे रंग वेगळे, त्यांचे आपण स्वागत केले. त्यांना आपण परत पाठवू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.