ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येप्रकरणी संजीव उन्हाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुंदर उर्फ दिलीप लटपटे यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, त्यांच्या भगिनी आणि मयत लटपटे यांच्या पत्नी वृंदा उन्हाळे यांच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास चालू असून संजीव उन्हाळे यांना अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
१४ एप्रिल रोजी ही आत्महत्या घडल्यानंतर सुंदर लटपटे यांच्या सुसाईड नोट मध्ये संजीव उन्हाळे यांचे नाव होते परंतु त्यानुसार थेट उन्हाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करता पोलिसांनी या संदर्भात कायदेविषयक सल्ला घेऊन अखेर लटपटे यांच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अजुनही तपास चालू असल्याचे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी सांगितले.