Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात येत्या ४८ तासांत गडगडाटी वादळसह मुसळधार पावसाचा इशारा

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

Advertisements

हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा, पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या शहरांमध्येही पावसाची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

अकोला जिल्ह्यात शनिवार, ८ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. ७ आणि ८ एप्रिलला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी पश्चिम विदर्भात, तर शनिवारी पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे.

 


#MahanayakOnline : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!