धक्कादायक नांदेडमध्ये ऑनर किलिंग; विजेचा शॉक देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीची हत्त्या

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये ‘ऑनर किलिंग’ची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वडील, काका आणि दोन भावांनी मिळून मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृत तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याप्रकरणी पोलिसांनी वडील, काका आणि चुलत भावासह पाच जणांना अटक केली आहे.

Advertisements

२२ जानेवारीच्या रात्री शुभांगी जोगदंड या २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा तिच्याच कुटुंबीयांनी विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह जाळून राख नदीत टाकण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी गावातील एका मुलावर प्रेम करत होती पण घरच्यांनी दुसऱ्या मुलासोबत तिचा साखरपुडा केला होता. दरम्यान साखरपुडा मोडल्याने कुटुंबीयांना अपमान झाल्याचे वाटल्याने त्यांनी त्याची हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements
Advertisements

कुटुंबाने स्वतःच्या वैद्यकीय विद्यार्थिनी मुलीची हत्या करून पुरावा नष्ट केला. मात्र गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नांदेड एसपी, यांनी सांगितले की, घरातील लोकांनी असा प्रकार केल्याची स्वतः कबुली दिली आहे. ज्या ठिकाणी राख सापडली आहे ती जागाही आम्ही पाहिली आहे आणि नदीतही काही वस्तू सापडल्या असून त्या फॉरेन्सिककडे पाठवण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांनी वडील, काका आणि चुलत भावासह पाच जणांना अटक केली आहे.

 

 

दोन विमानांची हवेतच टक्कर, एक पायलट शहीद


Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!