SharadPawarNewsUpdate : राम मंदिराच्या घोषणेवरून पवारांचा अमित शहा यांच्यावर ‘वार ‘

देशाचे गृहमंत्री पुजाऱ्याचीही जबाबदारी घेताहेत, काही हरकत नाही…
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना समर्पक उत्तरे देताना राम मंदिराच्या मुद्यावरून गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करताना राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. गृहमंत्री पुजाऱ्याचीही जबाबदारी घेताहेत, काही हरकत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना अयोध्येतील राम मंदिरावरुन हंट वार केला.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा निकाली काढल्यानंतर त्याचे श्रेय घेत भाजपकडून अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर हा प्रतिष्ठेचा आणि भावनेचा मुद्दा बनवण्यात बनविण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात हे मंदिर बनवून पूर्ण होत आहे याचे महत्व अधोरेखित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येतील बहुप्रतीक्षित रामलल्लाचे भव्य मंदिर पुढच्या वर्षी १ जानेवारीपर्यंत बांधून पूर्ण होईल, असे असे म्हटले होते. अमित शहांच्या या घोषणेसंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर पवार यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला.
अमित शहांनी आसाममधील येथील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना, देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरची माहितीही दिली. तसेच, राम मंदिराचे लोकार्पण कधी होणार, याची तारीखही जाहीर केली.यावर बोलताना पवार म्हणाले की , राम मंदिर हा देशाच्या गृहमंत्र्यांचा हा विषय येतो की नाही माहित नाही पण ते पुजाऱ्यांची भूमिका साकार करीत आहेत. मुळात , सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच राम मंदिरासारखे विषय काढले जातात, असा आरोपही पवार यांनी केला.
दरम्यान सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे खरे काम नाही. शिवसेनेत दोन गट पडले ही गोष्ट खरी आहे. पण जो कडवा शिवसैनिक आहे, जो फिल्डवर काम करतो तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शरद पवार म्हणाले. याला कोल्हापूर देखील अपवाद नाही. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील असेही शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते अमित शहा…
जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचे अध्यक्ष होतो, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे, मंदिर तिथेच बांधणार; पण तारीख सांगत नाहीत… तर नोंद घ्या, १ जानेवारी २०२४ ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार झालेले दिसेल,’ असे ते म्हणाले. ‘केवळ राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्षे जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचे मंदिरही इतके भव्य बांधले जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल. काशी विश्वनाथ, महाकालचा कॉरिडॉर बनविला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनविले जात आहे. माँ विंध्यवासीनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान यावेळी पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मनसे नेते राज ठाकरे यांनाही कोपरखळी मारली . राज्यपालांबाबत बोलताना ते म्हणाले कि, राज्यापाल इथे नाखूशअसतील तर आम्ही पण सगळे त्यांच्याबद्दल नाखूश आहोत. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महाराष्ट्राला दर्जेदार राज्यपालांची एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. त्यांनी संविधानाचे रक्षण केले. मात्र, सध्याचे राज्यपाल हे सातत्याने वादात असतात, त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होते. ते चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यामुळे जनतेला त्यांच्याबद्दलची नापसंती व्यक्त करावी लागते, असे शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे महत्वाचे पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या टीकेची दखल नाही …
राज ठाकरे यांच्या टीकेचा प्रतिवाद करताना शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे नेतृत्त्व कोणत्या नेत्यांकडे होते, हे पाहावे. सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ यांनी पक्षाचं नेतृत्त्व केले. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, हे पाहावे लागेल. राज ठाकरे हे आज पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी ते शरद पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देऊ शकतात.