टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या

मुंबईतील जुहू भागात एका फ्लॅटमध्ये मुलाने स्वतःच्या ७४ वर्षीय आईची हत्या केली आहे. हत्या झालेली महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत. याची माहिती टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये नीलू कोहली यांनी लिहिले, “वीणा जी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केले.”
https://www.instagram.com/p/Cl5YPqdM4fn/?utm_source=ig_embed&ig_rid=32b73334-7e10-4159-8351-f0cf720d254d
“चौकशी दरम्यान मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याने रागाच्या भरात बेसबॉलच्या बॅटने अनेक वार करून आपल्या आईची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने जुहू भागातील १२ कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्या आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह कार्टनमध्ये पॅक केला आणि मुंबईपासून ९० किलोमीटर लांब माथेरानच्या जंगलात फेकला.”
Current Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिक वर