ShivsenaNewsUpdate : कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी : सुषमा अंधारे

मुंबई । राजू झनके : कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरीसुद्धा 153 अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबी खाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा शुभशकुन आहे असे आम्ही समजतो. शिवसैनिकांनो उत्साहाने कामाला लागा असे निवेदन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर दिले आहे.
ठाण्यातील प्रबोधन यात्रेत प्रक्षोभक , चिथावणीखोर बदनामी करणारी भाषणे केल्याबद्दल सुषमा अंधारे , भास्कर जाधव यांच्यासह ७ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समजताच सुषमा अंधारे यांनी हे निवेदन जरी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे कि , विविध प्रसार माध्यमांकडून असे कळले की, महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे मी स्वतः, आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत, आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती 153 अ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अजूनही माझ्याकडे रीतसर याची प्रत मिळालेली नाही.
महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषण पब्लिक डोमेन मध्ये आहेत. ती तपासून घेता येतील मला खात्री आहे त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही.