AurangabadCrimeUpdate : पुन्हा अवतरले ट्रक चोर ,२० लाखांचा ट्रक जप्त , दोघांना बेडया

औरंगाबाद – सात महिन्यापूर्वी नागालॅंड मधून चोरी केलेला ट्रक नागपूर ला आणून त्याची किरकोळ भावात विक्री करणारी टोळी ट्रक खरेदी करणाऱ्या नागरिकाच्या लक्षात येताच ट्रक चोरांच्या टोळीतील दोन सदस्य गुन्हेशाखेने १९ लाख ५० हजारांच्या ट्रक सहित गजाआड केले . त्यांना सिडको पोलिसांच्या हवाली केले असून कोर्टाने आरोपिंना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
कल्याण अंबादास उचित (३२) रा. येवला नाशिक, व राजू वामन खरात रा. कन्नड अशी अटक आरोपीची नावे आहेत . उचित चा एक साथीदार नागपुरात राहात असून कालुभाई असे त्याचे नाव पोलीस तपासात उघड झाले आहे उचित हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे त्याने १५ लाख ५० हजारांचे कर्ज त्याचा ड्रॉयव्हर राजू खरात च्या नावे फुलर्टन इंडिया कडून वरील ट्रक खरेदी करण्यासाठी घेतले होते त्यानंतर हा ट्रक त्याने मछिंद्र बनकर नावाच्या व्यक्तीला केवळ ३ लाख ५० हजारात विक्री केला. पण बनकर ला या ट्रक चे इंजिन दुसऱ्या गाडीचे आहे हे लक्षात आले व गुन्हा उघडकीस आला आरोपी उचित बनकारच्या नावावर पुन्हा ट्रकसाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असतांना गुन्हेशाखेने आरोपी गजाआड केले
दोन वर्षांपूर्वी कुख्यात जफर बिल्डर ला ५०० ट्रक चोरी केल्या प्रकरणी तत्कालीन गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यानी अटक केली होती. पण अधिकाऱयांच्या अंतर्गत वादामुळे पुढे त्या तपासाचे काय झाले यावर पोलीस अधिकारी बघावं लागेल असे उत्तर देऊन मोकळे होतात या प्रकरणात परिवहन विभागाचा हात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
वरील कारवाई पोलीस उपायुक्त अपर्णाला गीते ,पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे, काशिनाथ महान्जोल , पीएसआय रावसाहेब जोंधळे यांनी पार पाडली या प्रकरणी पुढील तपास पीएसआय अशोक अवचार करत आहेत